राज्य शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्याची भरीव कामगिरी

। अलिबाग । वार्ताहर ।
औरंगाबाद येथे 71 वी हौशी राज्यस्तरीय विविध प्रकारच्या शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा कोरोना गाईडलाईन्सचे काटेकोरपणे पालन करत संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्याचा 15 स्पर्धकांचा चमू तरला होता. त्यापैकी 8 स्पर्धकांनी पहिल्या 6 क्रमांकावर बाजी मारली. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी संंघटनेचे सचिव संतोष साखरे यांनी काही स्पर्धेचे पंच परिक्षण केले, तर काही स्पर्धांचे सुत्रसंचालन केले. सुनील राणे यांनी टीम मॅनेजर तर विक्रांत पाटील यांनी व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली.
या स्पर्धेत ठाण्यातील अजय पाटील यांनी महाराष्ट्र श्री 2022 हा किताब पटकावला. तर रायगड जिल्ह्यातील अजित वामन म्हात्रे महाराष्ट्र उदय गट 2 मध्ये प्रथम क्रमांक, जितेंद्र गणनाथ पाटील महाराष्ट्र श्रीमान गट 4 मध्ये दुसरा क्रमांक, अनंता शांताराम भोईर महाराष्ट्र श्रीमान गट 2 मध्ये तिसरा क्रमांक, विकास नरहरी पाटील महाराष्ट्र श्रीमान गट 3 मध्ये पाचवा क्रमांक, दिवेश हरिश्‍चंद्र कळबटे महाराष्ट्र कुमार गट 1 मध्ये दुसरा क्रमांक, संकेत संजय वर्तक महाराष्ट्र कुमार गट 3 मध्ये दुसरा क्रमांक, अनिकेत जनार्दन पाटील महाराष्ट्र मेन फिजिक गट 2 चौथा क्रमांक, मनीषा अरविंद कालवणकर महाराष्ट्र वुमेन फिटनेस सहावा क्रमांक अशी स्पर्धकांनी बाजी मारली. या स्पर्धेमध्ये वुमेन फिटनेस, वुमेन बॉडी बिल्डिंग या स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केल्या होत्या आणि या स्पर्धा प्रमुख आकर्षण ठरल्या.

Exit mobile version