रायगड मेडिकल असोसिएशनचे वार्षिक अधिवेशन

| कर्जत | प्रतिनिधी |

रायगड मेडिकल असोसिएशनचे वार्षिक रायकॉन 2026 हे दोन दिवसीय अधिवेशन कर्जतमध्ये साल्ट ओलेंडर फार्म येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्षपद डॉ. आशुतोष कुलकर्णी यांनी भूषविले. उद्घाटनप्रसंगी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि प्रख्यात इतिहास संशोधक प्रा. डॉ. कुरुष दलाल उपस्थित होते. यावेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 700 डॉक्टर्स उपस्थित होते.

या अधिवेशनाची जबाबदारी अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी यांच्यासह रायगडचे सचिव डॉ. प्रशांत गांगल आणि खजिनदार डॉ. कुमार ओसवाल आणि त्यांचे कर्जत मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सभासद यांनी यांनी उचलली होती. यावेळी संपादक डॉ. दिलीप सावळे यांनी संपादन केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कैंसर, स्त्रीरोग, आयुर्वेद, होमिओपॅथी, अस्थिरोग, हृदयविकार, मेंदूविषयी आजार, इतिहासकारांच्या नजरेतून भारतीय खाद्यसंस्कृती अशा अनेक विषयांवर संपूर्ण दोन दिवस व्याख्यानाद्वारे डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात आले.

या अधिवेशनामधे रायकॉन 26 चे प्रमुख सल्लागार डॉ. प्रेमचंद जैन, साइंटिफिक चेयरमैन डॉ. गंगोलिया, कर्जत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आशिष कर्वे, डॉ. मनोहर साबणे, माजी अध्यक्ष डॉ. निलकंठ फडके, चीफ ऑर्गनायझिंग चेयरमैन डॉ. गणेश साळुंखे, ऑर्गनायझिंग चेअरमन डॉ. श्रीपाल जैन आणि डॉ. गजानन चव्हाण, डॉ महेश शिरसाट, डॉ. भावेश ओसवाल, डॉ आदित्य जंगम, डॉ. प्रतीक कांबळी, डॉ. राहुल पाटील यांसह सर्व कर्जत मेडिकल असोसिएशनच्या सभासदांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र बालरोग संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील, रायगडचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद गांधी, डॉ. रमेश पटेल, डॉ. आदेश पाथरे, डॉ. राज कल्याणी, डॉ. राजेंद्र चांदोरकर आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version