रायगड मनसे क्रिकेट स्पर्धा: टेंभिवली संघ विजेता

| नेरळ | प्रतिनिधी |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड जिल्ह्याचे वतीने कर्जत तालुक्यातील आषाणे येथे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यातील 32 संघांचा समावेश होता. मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून सलग दुसर्‍या वर्षी एक लाखाचे पहिले पारितोषिक असलेली स्पर्धा ठाणे जिल्ह्यतील भिवंडी तालुक्यातील टेम्भिवली संघाने जिंकली.

मनसे रायगड जिल्हा आणि भैरवनाथ क्रिकेट संघ यांनी मिळून आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भिवंडी तालुक्यातील टेंभिवली क्रिकेट संघाने ग्रामीण भागातून अंतिम संघात प्रवेश केलेल्या कर्जत तालुक्यातील शिवशक्ती क्रिकेट संघाचा चुरशीच्या सामन्यात पराभव करून विजेतेपद मिळविले आहे. तिसरा क्रमांक उरण तालुक्यातील जसखार संघाने पटकावला आणि चौथ्या क्रमांकावर कर्जत तालुक्यातील भूतीवली संघाला मिळाला आहे.या स्पर्धेतील मालिकावीर शिवशक्ती कडाव संघाचा कल्पेश साळुंके ठरला आणि त्याबद्दल मोटारसायकल भेट देण्यात आली.

माजी आ. बाळा नांदगावकर ,शिरीष सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. तर मनसे रेल्वे संघटनेचे मुंबई पासून सर्व पदाधिकारी हे या स्पर्धेसाठी उपस्थित होते. यु ट्यूब वर थेट प्रक्षेपण केलेल्या या स्पर्धेचे प्रेक्षेपण एक लाखाहून अधिक यांनी पाहिले असून

Exit mobile version