थांग-ता स्पर्धेत रायगडचे खेळाडू चमकले

पाच सुवर्ण, तीन रौप्यसह 17 कांस्य पदकांची कमाई
। खरोशी । वार्ताहर ।
कोल्हापूर मेणचे येथील आर्दश विद्यानिकेतन येथे ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशनच्या वतीने राजस्तरीय थांग-ता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण, तीन रौप्यसह 17 कांस्य पदकांची कमाई करीत घवघवीत यश संपादन केले आहे.

रायगड थांग-ता असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली सहभाग घेतलेल्या खेळाडूंनी या स्पर्धेत वीर मुंबरकर, रितुल म्हात्रे, स्वरा पवार, प्रद्युम म्हात्रे, रोहित भोसले यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. विराज मोकल, प्रेम म्हात्रे, जान्हवी वनगे, अभिषेक वर्तळे यांनी रौप्यपदकावर नाव कोरले. तर, ओम पाटील, पुष्कर म्हात्रे, युवराज भगत, दुर्वा पेरवी, दिशा गुरव, गायत्री कारखानिस, यर्दाथी पाटील, स्वरूपा चौधरी, निल पाटील, अयुष पाटील, खुशहाल सिंग, राजविर देशमुख, तेजश्री ऐवळे, परिणीता मोकल, रिया भानुस्कर, रविना म्हात्रे यांनी कांस्यपदक पटकाविले. स्पर्धेदरम्यान पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि 17 कांस्यपदके पटकावून घवघवीत यश संपादन केले.

सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून प्रशांत गांगर्डे अदित्य तेरेदेसाई, विनायक पाटील यांनी काम पाहिले. या स्पर्धा ऑल महाराष्ट्र थांग-ताचे सचिव महावीर धुळधर, कोल्हापूर थांग-ता असोसिएशनचे सचिव अविनाश पाटील व आर्दश विद्यानिकेतन ह्या संस्थेच्या अध्यक्षतेखाली पार पाडल्या. सर्व यशस्वी खेळाडूंचे रायगड थांग-ताचे सचिव मंदार पनवेलकर यांनी केले आहे. दरम्यान, सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडूंची कन्याकुमारी तामिळनाडू येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या थांग-ता संघात निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना सर्व स्तरातून कौतुक व शुभेच्छा देण्यात येते आहेत.

Exit mobile version