जंजिरा चायलेंजर्स उपविजेता
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील आरसीएफच्या मैदानावर सुरू असलेल्या पंचवीस वर्षांखालील रायगड प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत साबळे संघमालक असलेल्या रायगड वॉरियर्स संघाने स्पर्धेत अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला आहे. जंजिरा चायलेंजर्स संघाला उपविजेता संघ म्हणून समाधान मानावे लागले. अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रायगड वॉरियर्स संघाचा अजिंक्य रसाळ व जंजिरा चायलेंजर्स संघाचा सिद्धार्थ म्हात्रे यांनी अष्टपैलू खेळ करून उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात रायगड वॉरियर्स संघांनी जंजिरा चायलेंजर्स संघावर 5 गडी राखून विजय मिळवला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या जंजिरा चायलेंजर्स संघांनी 20 षटकांमध्ये 8 गडी गमावत 133 धावा फलकावर लावल्या. सिद्धार्थ म्हात्रेच्या सर्वाधिक 41 व अनिकेत गदमळे यांनी 28 धावा काढल्या. जंजिराकडून अजिंक्य रसाळ, भावेश कुरुंगळे यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. 134 धावांचे लक्ष घेऊन फलंदाजीला आलेल्या रायगड वॉरियर्स संघाचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर मधल्या फळीत अजिंक्य रसाळ यांनी एकाबाजूने टक धरून चौफेर फटकेबाजी करत नाबाद 40 धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूने राहुल भोईर यांनी 29 धावा काढल्या. शेवटचे दोन षटक शिल्लक असताना 22 धावांची गरज संघाला होती. भावेश कुरुंगळे आणि हार्दीक कुरुंगळे यांनी बहुमूल्य 15 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात षटकार मारून रायगड वॉरियर्स संघांनी निकाल लावला.
सचिन राऊळ संघमालक असलेल्या जंजिरा चायलेंजर्स संघाला सलग दुसऱ्या वर्षीच्या पर्वात सुद्धा उपविजेता संघ म्हणून समाधान मानावे लागले. स्पर्धेतील अंतिम विजयी संघ रायगड वॉरियर्स संघमालक यशवंत साबळे, प्रशिक्षक शंकर दळवी, उपविजेता संघ जंजिरा चायलेंजर्स संघमालक सचिन राऊळ, प्रशिक्षक उमाशंकर सरकार. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून अष्टपैलू खेळाडू अजिंक्य रसाळ ठरला. संपुर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या सिद्धार्थ म्हात्रेला मालिकवीर व उत्कृष्ठ फलंदाज, तर अजिंक्य रसाळ याला स्पर्धेतला सर्वात मौल्यवान खेळाडू व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले.
संपूर्ण स्पर्धा ड्रिम्स क्रिकेट यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात आली तर क्रिक हिरोज वर बॉल टू बॉल लाईव्ह स्कॉर पाहता आला. अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यध्यक्ष प्रदिप नाईक, आदिती नाईक, आरडीसीए सचिव संजय तावडे, आरसीएफच्या क्रीडा विभागाचे प्रमुख पांडुरंग सोनार, आरपीएलचे अध्यक्ष राजेश पाटील, सचिव जयंत नाईक, कौस्तुभ जोशी, डॉ.राजाराम हुलवान, संदेश गुंजाळ, पंच प्रशांत माळी व प्रितम पाटील, संदीप जोशी, अँड.पंकज पंडित, योगेश ठाकूर, हुसेन तांबोळी, आदेश नाईक, समालोचक यासिन मर्चंट, संदीप जगे, यश मापगावकर, निखिल पडते यांच्या सह रायगड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.