रायगड प्रेस क्लबच्या उपक्रमाला सोळा वर्ष पूर्ण

शेताच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांचा केला सन्मान

। रोहा । वार्ताहर ।

रोहा प्रेस क्लबच्यावतीने नुकतेच प्रयोगशील युवा शेतकरी रतीश मगर (रा.घोसाळे) आणि केशव खरिवले (रा.सांगडे) यांना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मानपत्र, शाळ, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज शेती व्यवसायापासून दूर जातोय हे वातस्व असतानाच रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची संस्था रायगड प्रेस क्लब, रोहा प्रेस क्लबने अभिनव उपक्रम सुरू केला. बळीराजाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष स्व.संतोष पवार यांची संकल्पना, प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृतिशील प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकर्‍यांचा सन्मान त्यांच्याच शेताच्या बांधावर जाऊन दरवर्षी केला जातो. दरम्यान, कृतिशील शेतकर्‍यांचा सन्मान रोहा प्रेस क्लब पत्रकारांनी केल्याने शेतकरी संघटना, कृषी विभाग व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली, तर हा पुरस्कार शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, संधी यांना अधिक प्रोत्साहन देणारे आहे अशी भावना आदर्श शेतकरी सन्मान प्राप्त शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

गेली सोळा वर्ष अविरतपणे रायगड जिल्ह्यात रायगड प्रेस क्लबच्यावतीने तसेच रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून येथील कृतिशील आणि प्रयोशिल प्रगत शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात येत आहे. सन्मान सोहळ्याला रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे, मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, प्रिया कांबळे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, कृषी अधिकारी प्रकाश राक्षीकर, पत्रकार राजेंद्र जाधव, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर ,कृषी अधिकारी महादेव करे,रोहा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी उत्तम मार्गदर्शन केले. शेतकरी रतीश मगर, केशव खरीवले यांनी शेतीबाबत तसेच विविध पिके, शेतीपूरक व्यवसाय मिळणार्‍या उत्पन्नाची माहिती दिली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा, शेती प्रयोगाचे फायदे बदलत्या काळात युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल, अशी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे यांनी केले. सुहास खरीवले, नरेश कुशवाह, श्याम लोखंडे, शरद जाधव, जितेंद्र जाधव, संदीप सरफळे, महेश बामुगडे, अंजुम शेटे, समिधा अष्टीवकर, नंदकुमार बामुगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version