दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता

| रसायनी | प्रतिनिधी |

कुलाबा दिव्यांग सोशल फाऊंडेशन इंडिया व कुलाबा दिव्यांग क्रिकेट असोसिएशन आयोजित मैत्री चषक 2026 मुंबई रायगड, नवी मुंबई, ठाणे या चार संघामध्ये मोहोपाडा एनआयएसएम मैदानावर खेळविण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच संदीप मुंढे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा माजी अध्यक्ष गणेश वर्तक, अमित शहा, सुनील भोसले, नागेश कदम उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा सदस्य दिव्यांग कल्याण मंत्रालय साईनाथ पवार व जिल्हाध्यक्ष शैलेश सोनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेत रायगड संघ आणि नवी मुंबई संघात अंतिम सामना झाला. यात रायगड संघाने नाणेफेक जिकूंन प्रथम गोलंदाजी करत नवी मुंबई संघाने 10 षटकात 7 विकेट 56 धावा केल्यातर रायगड संघाने 9 विकेटने विजय प्राप्त केला.

या स्पर्धेत रायगड संघाचे प्रसाद मॅन ऑफ द सिरीजचा मान ऋषिकेश पाटील, उत्कृष्ट फलंदाज म्हणून कल्पेश ठाकूर उत्कृष्ट गोलंदाज व नवी मुंबई संघाचे महेश वसावे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकचा मानकरी ठरले.या स्पर्धेचे आयोजन कुलाबा दिव्यांग फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष शशांक हिरवे कार्याध्यक्ष तथा सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे सचिव शिवाजी पाटील, सचिव सुनील पाटील, खजिनदार अरुण घोडके, स्वामीज्ञ फाऊंडेशनचे अध्यक्ष अंजली घोडके, कल्पेश तवले, मंगेश पारटे, नागनाथ घोडके, रुपेश पवार, चंद्रकांत पवार, रवी भोईर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश खाने, प्रफुल विचारे, नंदकुमार मोरे चौक, तानाजी खंडागळे, उद्योजक अभिजित देशमूख, जगदीश हातमोडे, निखिल मालुसरे राज नंदबार,शिवाजी पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version