बेंचप्रेस स्पर्धेत रायगडला तीन पदकं

| अलिबाग | वार्ताहर |

बंगळुरू येथे राष्ट्रीय क्लासिक आणि इक्विप बेंच प्रेस स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यामध्ये खुल्या गटातील स्पर्धेत 74 किलो वजनी गटात रायगडच्या आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू अक्षय शनमूगम (आयर्न मेट जिम खोपोली) याने नवीन राष्ट्रीय विक्रम करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. तसेच ज्युनियर स्पर्धेत तन्मय पाटील (संसारे फिटनेस पेण) याने रौप्यपदक, तर मास्टर स्पर्धेत 74 किलो वजनी गटात दिनेश पवार (लोखंडे जिम खोपोली) याने कांस्यपदक मिळविले.

या तिन्ही पदक विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांचे प्रशिक्षक, जिम संचालक यांचे संघटनेने कौतुक केले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले होते. या तिन्ही पदक प्राप्त खेळाडूंचे पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडच्यावतीने अध्यक्ष गिरीश वेधक, उपाध्यक्ष श्रीनिवास भाटे, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सचिव पाटकर, सहसचिव सचिन भालेराव, राहुल गजरमल, माधव पंडित, दत्तात्रय मोरे, सुभाष टेंबे, संदीप पाटकर यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version