नृपाल पाटील यांच्यासहमान्यवरांची उपस्थिती
। अलिबाग । वार्ताहर ।
मंदार वर्तक मित्र मंडळ, नागाव – आक्षीतर्फे रायगड श्री 2022 रायगड जिल्हास्तरीय खुली शरीरसौष्ठव स्पर्धेत अलिबाग येथील डिवाईन एनर्जी जिमचा संदीप उले यानी रायगड श्री किताब पटकाविला.
ही स्पर्धा शनिवारी (दि.26) नागाव हायस्कुल येथे पार पडली. महाराष्ट्रात प्रथमच एकत्रित बॉडी बिल्डिंग व मेन फिजिक जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेला रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण 43 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत 55 किलो वजनी गटात अक्षय गव्हाणे (बबली फिटनेस इंदापूर), 60 किलो वजनी गटात जुगाल शिवले (जाधव फिटनेस खोपोली), 66 किलो वजनी गटात अक्षय वेळे (सार्वजनिक व्यायामशाळा अलिबाग), 70 किलो वजनी गटात विशाल बानकर (सार्वजनिक व्यायामशाळा आक्षी), 75 किलो वजनी गटात राजेंद्र गाणार (डिवाईन एनर्जी जिम अलिबाग), 75 किलोच्या पुढील वजनी गटांमध्ये संदीप उले (डिवाईन एनर्जी जिम अलिबाग) यांनी विजेतेपद पटकावले.
तर, उपविजेता राजेंद्र गाणार (डिवाईन एनर्जी जिम अलिबाग), बेस्ट पोजर अक्षय गव्हाणे (बबली फिटनेस इंदापूर), मोस्ट इम्प्रूव्हमेंट जुगाल शिवले (जाधव फिटनेस खोपोली) आणि विशाल बानकर (सार्वजनिक व्यायामशाळा आक्षी) हे ठरले असून मेन फिजिक स्पर्धेत भावेश म्हात्रे (ए.टी.फिटनेस) विजेता ठरला असून मेन अॅथलेट स्पर्धेत धर्मेंद्र वर्तक (डिवाईन एनर्जी जिम अलिबाग) विजयी झाला.
या स्पर्धेचे पंच म्हणून सचिन पाटील (सचिव), महेश गणगे (सचिव पिंपरी-चिंचवड), शरद म्हात्रे, संदीप पाटील, निकेश पाटील, कौस्तुभ पापळ, अनिकेत कदम, स्वप्नील पाटील हे होते.
तसेच, या स्पर्धेला वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉन्झ मेडल विजेते, दोन वेळा मास्टर कॅटेगरीमध्ये मिस्टर इंडिया, दोन वेळा महाराष्ट्र टायटल विनर सहा.पो.नि. सुभाष पुजारी, वर्ल्ड बॉडी बिल्डिंग फेडरेशन जनरल सेक्रेटरी चेतन पाठारे, वर्ल्ड बॉडी बिल्डिंग फेडरेशन लिगल अॅडवायझर अॅड. विक्रम रोठे, कोकण बॉडी बिल्डिंग फिटनेस स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष अॅड. किरण कोसमकर, वर्ल्ड शॉर्टेस्ट कॉम्पिटिटिव्ह बॉडी बिल्डर, गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर प्रतीक मोहिते, अॅथेलेट, मिस एशिया आदिती बंब आदी मान्यवर उपस्थित होते.