दिवेआगर येथे रायगड पर्यटन परिषद

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर इ.सागरी किनारपट्टी भागांत पर्यटन व्यवसाय वेगाने वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे साहजिकच स्थानिक रोजगाराच्या संधी अधिकाधिक वाढत आहेत. रायगडमधील पर्यटन हे अधिक सुनियोजित व दर्जेदार व्हावे या दृष्टीने कोकण क्लब (रायगड जिल्हा दक्षिण)आणि कोकण बिझनेस फोरम रायगड (दक्षिण), तसेच दिवेआगर, श्रीवर्धन ,हरिहरेश्वर मधील पर्यटन संस्था यांच्या माध्यमातून एक अभियान सुरु करण्यात आले आहे.त्या अंतर्गत पर्यटन विकासाचे दृष्टीने महत्वपूर्ण असे मरायगड पर्यटन परिषद म हे एक दिवसाचे मार्गदर्शन शिबीर दि.9 ऑगस्ट 23 रोजी सकाळी 10 ते सायं.6 या वेळांत दिवेआगर येथील क्षितिज हॉलिडेज येथे कोकण क्लब व कोकण बिझनेस फोरम यांच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे असे वरील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.संजय यादवराव यांनी जाहीर केले.

या शिबिरात पर्यटन व्यवसायाच्या विविध पैलूंच्या दृष्टिकोनातून तज्ज्ञांचे महत्वाचे मार्गदर्शन व उद्बोधक चर्चा होणार आहे. त्यामध्ये सर्वश्री द.म.सुकथनक ,संजय यादवराव ,मकरंद केसरकर, प्रा. संजय शिर्के,प्रसाद कोळंबकर,राजन कुमठेकर,महेश सानप,संदिप भोसले,रामदास कळंबे आदि तज्ञ व्यक्ती सहभागी होणार आहेत .तसेच रायगडमधील नाविन्यपूर्ण पर्यटन यासंबंधी सर्वश्री उदय बापट,मनोहर चोपडे, शशिकांत महाडकर,प्रफुल्ल पेंडूरकर यांच्या अनुभव कथनाचा लाभही उपस्थितांना मिळणार आहे.तरी पर्यटन व्यवसायात असणा-या अथवा नव्याने सुरु करु इच्छिणा-या जास्तीत जास्त व्यावसायिकांनी या परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version