अपंगांच्या क्रिकेट सामन्यात रायगड विजेता

शैलेश पाटील स्पर्धेचा मानकरी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे आयोजित करण्यात आलेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात रत्नागिरी संघाचा पराभव करून रायगड संघाने विजेतेपद पटकावले. शैलेश पाटील स्पर्धेचा मानकरी ठरला.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रत्नागिरी संघाविरुदध रायगड संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित सहा षटकामध्ये 50 धावा केल्या. शैलेश पाटील, सहदेव बर्डे, कल्पेश ठाकूर हितेश, पाटील व ऋषिकेश पाटील यांनी चांगली फलंदाजी केली. रायगडाच्या भेदक गोलंदाजीमुळे रत्नगिरी संघ टिकू शकला नाही.रत्नागिरीने 32 धावा केल्या. रायगडचे 18 धावांनी हा सामना जिंकून विजेतेपद पटकावले. रायगडच्या विजयात महत्वाचा वाट उचलणार शैलेश पाटील याला स्पर्धेचा मानकरी म्हणून गौरवण्यात आले.

मंगेश जाधव नागोठणे कर्णधार, शैलेश पाटील अलिबाग उप कर्णधार, सहदेव बर्डे रोहा, हितेश पाटील अलिबाग, कल्पेश ठाकुर नागोठणे, ऋषिकेश पाटिल रोहा, संदीप दगडू ठाकुर पांडापुर पेण, संदीप ठाकूर आमटेम पेण, विलास कदम आपटा पनवेल, मुकेश पिंगळे तळा, नितीन महाबंळे रोहा, शकिल उकये म्हसळा यांचा रायगडच्या संघात समावेश होता. जिल्हा दिव्यांग क्रिकेट संघ साईनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली तयार झाला. मंगेश दळवी संघाचे प्रशिक्षक होते. विजय लाड व राजेंद्र कांबळे हे या संघाचे व्यवस्थापक होते. उमेश भोकटे यांनी रायगड संघला पुरस्कृत केले होते.

Exit mobile version