रायगडचा महिला कबड्डी संघ परभणीला रवाना

। पेण । वार्ताहर ।
राज्य अजिंक्यपद निवड चाचणी दि.22 व दि.23 डिसेंबरला परभणी येथे होत असून रायगड जिल्ह्यातील महिलांचा कबड्डी संघ परभणीकडे रवाना झाला आहे.
पाटणेश्‍वर येथे प्रशिक्षक पांडूरंग पाटील यांच्या देखरेखीखाली तीन दिवस सराव शिबीर संपन्न झाले. या शिबिराची सांगता पाटणोली गावच्या सरपंचा मानसी पाटील यांच्या उपस्थितीत पाटणेश्‍वर येथे संपन्न झाली. त्यावेळी निवृत्त पोलीस उपनिरिक्षक क्रिडा समिक्षक विश्‍वनाथ पाटील, पाटणोली गावचे मा.सरपंच किशोर पाटील, काँग्रेसचे किसान मोर्चाचे चंद्रकांत पाटील, कबड्डीप्रेमी लक्ष्मण पाटील, सरिता पाटील, नगरसेवक संतोष पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी क्रिडा समिक्षक विश्‍वनाथ पाटील व संतोष पाटील यांनी मार्गदर्शन पर भाषण करून महिला कबड्डी संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर सरपंच मानसी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व महिला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. रायगडच्या या महिला संघामध्ये कर्णधार तेजा सकपाळ पनवेल, उपकर्णधार मोनाली घोंगे कर्जत, रचना म्हात्रे पनवेल, उजवा मध्य रक्षक नंदीनी वाघे पनवेल, दर्शना पाटील आवास, चैत्राली म्हात्रे किहिम, ममता सुतार कळंबोली, संजना पाटील पाटणेश्‍वर, सोनम साळूंके कळंबोली, कोमल पेरवी कळवे, दिव्या साजेकर रोहा आणि सायली पाटील वेश्‍वी, प्रशिक्षक पांडूरंग पाटील पाटणेश्‍वर, संघ व्यवस्थापक ॠणाली मोकल गडब हा रायगडचा संघ परभणीकडे रवाना झाला आहे.

Exit mobile version