। कर्जत । प्रतिनिधी ।
अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी आणि सुवर्णा जोशी यांच्या विशेष प्रयत्नातून राजिप गुढवणवाडी शाळेत दोन नवीन वर्ग खोल्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. अतिशय दुर्गम भागातील गुढवण वाडीतील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कित्येक वर्ष दोन खोल्यांमध्ये 1 ली ते 7 वी इयत्तेतील 80-85 विद्यार्थी शिक्षण घेत होते. अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीच्या सीएसआर फंडमधून शैक्षणिक साहित्य वाटपास आलेल्या गौरी साठे आणि सुवर्णा जोशी यांच्याकडे तत्कालीन मुख्याध्यापक राजेंद्र कोळी आणि त्यांचे सहकारी यांनी वर्ग खोल्यांची मागणी केली होती. त्यानंतर ज्ञानेश्वर वाडीले, श्रीकृष्ण सुपे, पंढरीनाथ पाटील, घुले, ग्रामस्थ या सर्वांनी वेळोवेळी माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्याकडे पाठपुरावा करत अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी सीएसआर फंडमधून दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण करून देण्यात त्यांना यश आले आहे.
त्या वर्ग खोल्यांचे सोमवारी (दि.11) रोजी लोकार्पण सोहळा अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीचे संस्थापक अवधूत साठे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यासाठी गटशिक्षणाधिकारी अनंत खैरे, विस्तार अधिकारी अरुण पारधी, प. शि. म्हात्रे, दिलीप घुले, श्रीकृष्ण सुपे, ज्ञानेश्वर वाडीले, पंढरीनाथ पाटील, अर्जुन सपकाळ, शंकर फोडसे, संतोष मगर, कशेळे केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, शाळेचे माजी शिक्षक, दिनेश खडे, विद्यार्थी मित्र उपस्थित होते. अवधूत साठे, गौरी साठे, सुवर्णा केतन जोशी, अभिजीत शिर्के, संदीप भोईर यांचे आभार व्यक्त केले.







