मुरुड, रोहामधील विद्यार्थ्यांनी मिळविले 39 पदके
। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्यस्तरीय कराटे अजिंक्य स्पर्धा 21 जानेवारी रोजी ठाणे येथील श्रीरंग विद्यालयात पार पडली. या स्पर्धेत रायगडच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण कामगिरी केली. मुरूड व रोहामधील विद्यार्थ्यांनी 36 पदके मिळविली आहेत. त्यात सुवर्ण, कांस्य, रजत पदकांचा समावेश आहे.
या स्पर्धेत रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, बारामती, नाशिक, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी, धुळे येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अस्मि भायदे, वरद मोहिते, प्रार्थना कौलकर, स्वरूप पवार, सई फुलमाळी, यासिन मणियार, सार्थक कौलकर, श्रेणु विरकुड, जय गुडे, आराध्य नाईक, ओमकार शिवळकर, नीरज काते, नताशा जरे, मोक्षदा घायले, शुभरा आठवले, आराध्य ओक, आध्या मोरे, अथर्व खांडेकर, आर्या दालमिया, दीपक सहानी, श्रेय गोळे, रोहित जुजागर, सिद्धी इंगळे, आदित्य हशीलकर, दक्ष धुमणे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत चार सुवर्ण, 26 कांस्य व सहा रौप्यपदक मिळवून रायगडचे नाव उंचावले. प्रशिक्षक रुपेश दांडेकर यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केल्याने सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.