रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या 32 जिल्ह्यांची धुरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागचे निलेश पाटील यांची फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सलग तिसऱ्यांदा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनमध्ये बिनविरोध निवडून येत त्यांनी संघटनात्मक कार्याची छाप निर्माण केली असून, आता राज्यातील 32 जिल्हा संघटनांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पाटील यांच्या निवडीने इलेक्ट्रिकल क्षेत्रात रायगडचा झेंडा राज्यपातळीवर फडकला आहे.

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरच्या विविध प्रश्नांसाठी संघटनात्मक पातळीवर सातत्याने काम करणाऱ्या निलेश पाटील यांच्या निवडीमुळे रायगडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील 32 जिल्ह्यांतील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघटनांना एकत्रितपणे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. या निवडीबद्दल रायगडसह महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल क्षेत्रातून निलेश पाटील यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या नेतृत्वातून इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरच्या प्रश्नांना राज्यपातळीवर प्रभावी व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. निलेश पाटील यांना सर्व स्तरातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Exit mobile version