खारकोपर येथे रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरले

। उरण । वार्ताहर ।
खारकोपर स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशी रेल्वेचे तीन डब्बे घसरले, मात्र कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. रेल्वे सुरळीत सुरू होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. आज सकाळी ८.३० वाजण्याच्या खारकोपर रेल्वेस्थानकात येणारी प्रवाशी रेल्वेचे तीन डब्बे रेल्वेवरून घसरण्याची घटना घडली. यात दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

खारकोपर येणारी रेल्वे ही ८:५५ ला खारकोपर स्टेशन मधून सुटणार होती. त्याआधीच म्हणजे स्टेशन पासून अंदाजे ३००-४०० मीटर आधीच तीन डब्बे घसरले आहेत. घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. परंतु सेवा पूर्ववत होण्यास कितीवेळ लागेल हे नक्की सांगू शकत नाही. यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. दुपार नंतर सेवा पूर्ववत होईल असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Exit mobile version