शेतीसह अनेक रस्ते पाण्याखाली; घरांमध्ये पाणी गेल्याने जनजीवन विस्कळीत
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात तुफानी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीसह विविध ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले ओसंडून वाहात असून, नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण आहे. अलिबाग तालुक्यातील झिराडपाडा गावात पुराचे पाणी शिरले असून असाच पाऊस सुरु राहिला तर घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे







