। आगरदांडा । प्रतिनिधी ।
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावणार्या पावसाने अखेर मुरुड शहरासह तालुक्यात हजेरी लावली आहे. रविवारी रात्रीपासून शहरात विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊसाने जोरदार हजेरी लावली असून 154 मि.मि.नोंद झाली आहे. यामुळे मुरूडकरांना उकाड्यातून दिलासा मिळाला आहे. तर, शेतकरी ही सुखावला आहे. हा पाऊस सतत पडत राहिला तर लवकरच पेरणीला सुरुवात होईल. विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तीव्र पाणी टंचाईची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, पावसाच्या आगमनामुळे मुरूडकरांना विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावेळी, 15 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने वीज देता का वीज, आसा प्रश्न सध्या नागरिक विचारात आहेत.