केरळात पावसाचा हाहाकार

। केरळ । वृत्तसंस्था ।
सध्या केरळ राज्यात पावसाने थैमान घातले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झालाय. तसेच अनेक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केरळच्या विविध भागातून पावसाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही येत आहेत. या पावसामुळे नदीने रौद्र रुप धारण केले आहे. कोट्टायम जिल्ह्यात 40 वर्षीय व्यक्ती, त्याची 75 वर्षीय आई, 35 वर्षीय पत्नी आणि 14, 12 आणि 10 वर्षांच्या तीन मुलींसह कुटुंबातील सहा सदस्यांचा े मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय आहे. तर भूस्खलनामध्ये या कुटुंबाचे घर वाहून गेले आहे.

Exit mobile version