महत्त्वाची कागदपत्रे, फाईल भिजल्या
पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल येथील सिडको इमारतीतील असलेल्या मेट्रो सेंटरला गेल्या तीन दिवस सुरु असलेल्या पावसाचा फटका बसला. इमारतीतील स्लॅबमधून पावसाचे पाणी जोरात कार्यालयात पडल्याने सर्व ठिकाणी पाणीच पाणी साचले होते. यावेळी या कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, फाईल पाण्यामुळे भिजल्या. यावेळी मेट्रो सेंटर येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तात्काळ उपायोजना केल्या.
गेल्या पाच ते सहा दिवस रायगड परिसरासह पनवेलला मुसळधार पावसाने झोडपले आहे. या पावसाचा फटका नवीन पनवेल येथील सिडकोने बांधकाम केलेल्या इमारतीतील मेट्रो सेंटर कार्यालयाला बसला. या साचलेल्या पाण्यामुळे खाली असलेले महत्वाचे कागदपत्रे आणि फाईलीसुद्धा भिजल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी मेट्रो सेंटर, अधिकारी व कर्मचारी यांनी लागलीच उपाययोजना केल्या. त्याचबरोबर या पाण्यामुळे कार्यालयात वीज बोर्डामध्ये शॉर्ट सर्किट झाले होते. यावेळी अधिकारी यांनी सिडको कार्यालयात कळविले होते. तसेच वीज वितरण कार्लायतसुद्धा याबाबत माहिती देण्यात आली होती. यावेळी वीज वितरण कर्मचार्यांनी दुरुस्ती केली. त्याचबरोबर अश्या प्रकारे मोठ्या पाऊस आल्यास पुन्हा या कार्यालयात पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिडकोने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.