पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरात कांदा बटाटा विक्री करणार्या एका व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील बावन बंगला येथील निळकंठ गार्डन बी 202 येथे राहणारे ज्ञानेश्वर गिरे (48) यांनी राहत्या घरातील हॉलला असलेल्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.