अपार्टमेंट ओनर्स असो.च्या नोंदणी प्रश्नावर आवाज

| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |

पनवेल व नवी मुंबई परिसरातील अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या नोंदणी संदर्भातील दीर्घकालीन प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पनवेल महानगर अपार्टमेंट ओनर्स संस्था महासंघातर्फे याबाबत शासनाकडे ठोस भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

महासंघाने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (सिडको), नवी मुंबई यांना निवेदन सादर करत राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय विधी व न्याय विभागाकडून मंजूर होऊनही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या नोंदणीमुळे संस्थांच्या हक्क, व्यवस्थापन, लेखापरीक्षण, निवडणुका, वाद निवारण यांसारख्या महत्त्वाच्या बाबी अधिक सुकर होणार आहेत. तसेच, जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेलाही गती मिळणार असून, बँकिंग व्यवहारांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील, असेही महासंघाचे मत आहे.

Exit mobile version