| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आ.राजन साळवी यांची सोमवारी अलिबाग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागमार्फत चौकशी केली जाणार होती. मात्र राजन साळवी चौकशीला आलेच नसल्याने ही चौकशी झाली नाही.
राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाला विविध प्रकरणामध्ये अडकविण्याचा खटाटोप सत्ताधारी शिंदे, फडणवीस सरकारने सुरु केलेला आहे. यापूर्वी अॅड. अनिल परब, वैभव नाईक यांनाही अशाच चौकशांना सामोरे जावे लागले आहे. आता राजन साळवी यांना अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलेले होते. साळवी यांच्या मालमत्तेसंदर्भात चौकशीसाठी ही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र आमदार राजन साळवी हे आज उपस्थित न राहिल्याने ही चौकशी झाली नाही. साळवींकडून पत्राद्वारे मुदत वाढीची मागणी करण्यात आली आहे.