| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजाराम शिवराम म्हात्रे (89) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर चिरनेर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत शुक्रवारी (दि.12) नातेवाईकांसह, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना ग्रामस्थ व नाट्य कलाकारांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. चिरनेरचे माजी सरपंच अविनाश म्हात्रे, सूर्यकांत म्हात्रे, जेएनपीटीचे कर्मचारी प्रशांत म्हात्रे यांचे ते वडिल होतं. त्यांच्या पश्चात तीन मुलं, सुना, नातजावई, नातवंडे, पंतवंडे असा आप्त परिवार आहे.







