राजस्थानी युवकाची नेरळमध्ये आत्महत्या

| नेरळ | प्रतिनिधी |

नोकरीच्या निमित्ताने आलेल्या राजस्थानी युवकाने नेरळ येथील सिंपल लॉज मध्ये स्वतःच्या चामडी पट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली. प्रभुराम चालोर जिल्ह्यातील गौतम कुमार हा (20) तरुण नोकरीच्या निमित्ताने नेरळमध्ये आला होता. नेरळ येथे सिंपल लॉज येथे वास्तव्य होते. आर्थिक विवंचनेत असताना त्याने खोलीतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तो बराचवेळ बाहेर न आल्याने लॉजचे मालक अरुण अच्युत नायक यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आत मधील तरुण दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला असता गौतम कुमार ने आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. त्यानंतर अरुण अच्यू नायक यांनी नेरळ पोलिसात खबर दिली. नेरळ पोलीस ठाणे येथे या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार नितीन मंडलिक अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version