राजेंद्र गाणार ‘रायगड श्री’

आ. जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

। खारेपाट । महेंद्र म्हात्रे ।

जय हनुमान व्यायामशाळा कावाडे-बेलपाडा आयोजित जिल्हास्तरीय रायगड श्री, अलिबाग श्री, खारेपाट श्री शरीरसौष्ठव स्पर्धा शनिवारी (दि.4) उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत आ. जयंत पाटील व्यायामशाळेच्या राजेंद्र गाणारने ‘रायगड श्री’चा बहुमान पटकाविला. तर, तालुकास्तरीय स्पर्धेत याच व्यायामशाळेचा मकरंद पलंगे ‘अलिबाग श्री’चा मानकरी, तर श्रेयस म्हात्रे ‘खारेपाट श्री’चा मानकरी ठरला. या स्पर्धेचे उद्घाटन आ. जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडले. दरम्यान, कावाडे ग्रामस्थांकडून आ. पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी माजी आ. पंडित पाटील, राजिप माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती अनिल पाटील, आयोजक शरद म्हात्रे, गणेश पाटील, गणेश पाटील व मित्रमंडळ, आरडीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, राष्ट्रवादीचे अलिबाग मतदारसंघाचे तालुकाध्यक्ष अमित नाईक, डी.एल. साळावरकर, गिरीष कडवे, सरंपच मिळकतखार, रेवस उपसरपंच दीपक पाटील, राजेंद्र पाटील, राकेश कडवे, नंदू म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


गेली 13 वर्षे सातत्याने ही स्पर्धा जय हनुमान व्यायामशाळा कवाडे-बेलापाडाच्या माध्यमातून शरद म्हात्रे व मित्रमंडळाकडून भरविण्यात येत आहेत. या स्पर्धेत जिल्हाभरातून जवळपास 60 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक हजर होते.

Exit mobile version