| कळंबोली | प्रतिनिधी |
नवी मुंबई पोलीस दलातील कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोथे यांची नवी मुंबई डायल 112 शाखेच्या “सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी)” पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल पोलीस विभागासह सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजेंद्र कोथे यांनी आपल्या सेवाकाळात कळंबोली हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी कारवाई करणे, नागरिकांना न्याय व सुरक्षितता मिळवून देणे तसेच पारदर्शक व लोकाभिमुख पोलीस प्रशासन राबविणे यामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या डायल 112 या आपत्कालीन सेवा व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा लाभ नव्या जबाबदारीतून अधिक प्रभावीपणे मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







