युपीएसी परीक्षेत प्रथमेश राजेशिर्के यांचे यश

। चिपळूण । वार्ताहर ।
तालुक्यातील मांडकी गावचे सुपुत्र प्रथमेश अरविंद राजेशिर्के हे युपीएसी परीक्षेत 236 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून आएएस अधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. दिवंगत माजी मेजर अरविद राजेशिर्के हे त्यांचे वडील असून त्यांच्या आईचे नाव शर्मिला राजेशिर्के असे आहे. लहानपणापासून त्यांचे स्पर्धा परीक्षा देत प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न असून त्यांनी ते पुर्ण केले आहे. चिपळूण विधानसभा आमदार शेखर निकम व डेरवण शाळेतील मुख्याध्यापक शरयू यशवंतराव, नायशी उपसरपंच संदीप घाग, अमित सुर्वे यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे, शेखर निकम युवा मंच सावर्डे, सुभाष पाकळे प्रतिष्ठान आदींनी त्यांचा सत्कार केला आहे. सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version