जिल्ह्यात राजमाता जिजाऊंची जयंती उत्साहात

महाडमध्ये जिजाऊ जयंती साजरी
। महाड । प्रतिनिधी ।
महाडमध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची 425 वी जयंती उत्साही वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. येथील जिजामाता उद्यानामध्ये असलेल्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. महाड येथील शिवाजी चौक परिसरात असलेल्या पुतळ्याचे विधिवत पूजन व अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष बिपिन महामुनकर, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, महेश शिंदे ,चंद्रजीत पालांडे, निलेश तळवटकर, प्रमोद पवार ,चंद्रकांत मोरे त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती नीलिमा भोसले, सदस्य प्राजक्ता दळवी, नंदिनी मोरे ,भारती शिंदे, महाड शहर अध्यक्षा नमिता जोशी, मेघा ठाकूर, सौ.भारती शिंदे, कुमारी सई शिंदे ,नेहा वाघ, जिजीता बुटाला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषदेतर्फे राजमाता जिजाऊंना अभिवादन

जिल्हा परिषदेतर्फे राजमाता जिजाऊंना अभिवादन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने गुरुवारी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, किरण रावळ, संजय कवठेकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पेण तालुक्यातील जनता हायस्कुल गडब येथे राजमाता जिजाऊ जयंती

पेण तालुक्यात राजमाता जिजाऊ जयंती साजरी
पेण तालुक्यातील जनता हायस्कुल गडब येथे राजमाता जिजाऊ जयंती,स्वामी विवेकानंद जयंती, साजरा करण्यात आली. या वेळी लक्ष्मण पाटील, सरपंच मानसी पाटील,उपसरपंच मनोज म्हात्रे, सदस्या वैशाली पाटील, सिता पाटील, अनंत पाटील, एस. वाय लांगी, दिगंबर पाटील, मुख्याध्यापक सोनावने माजी मुख्याध्यापक टी. बी. मोकल आदी सह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेष्ठा पाटील व संचिता कोठेकर, या विद्यार्थिनींनी मी राजमाता जिजाऊ बोलते यावर आपले विचार मांडले.

पेण प्रांत कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदाची जयंती कार्यालयातील कर्मचार्‍यांनी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार व नायब तहसिलदार प्रसाद कालेकर यांच्या हस्ते राजमाता जिजाउंच्या व युग पुरूष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना हार घालून अभिवादन करण्यात आले. . त्यानंतर कर्मचारी वर्गांनी पुष्प वाहुन दोन्ही थोर विभूतींना अभिवादन केले.

कर्जतमध्ये अभिवादन
जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने शिवालय येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी नितीन सावंत, उत्तम कोळंबे, संतोष पांगत, दिनेश भासे, अरुण निघोजकर, आबा देशमुख, किशोर गायकवाड तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version