मेरीटाईम बोर्डाकडून राजपुरी जेट्टी पार्कींगला टाळे

ठेकेदाराची 38 लाख थकबाकी; पर्यटकांच्या गाड्या वाळूत
। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
ठेकेदाराकडे 38 लाखांची थकबाकी राहिल्याने मेरीटाईम बोर्डाने राजपुरी जेट्टी पार्किंगला टाळे ठोकले आहे. यामुळे ऐन पर्यटन हंगामात पर्यटकांची वाहने वाळूत उभी करुन ठेवावी लागत आहेत. मेरीटाईम बोर्डाने मुरुड जंजिरा परिसरात बांधलेला जेटी कायम वादात राहिल्या आहेत.

राजपुरी, आगरदांडा, दिघी व खोरा बंदर जेट्टी बांधल्यापासून तक्रारी सुरूच राहिल्या.राजपुरी जेट्टीवर भरतीच्यावेळी बोटी लावण्यास अडचण होते .खोरा बंदर लांबी कमी असल्याने ओहोटीला बोटी लागत नाही. आगरदांडा जंगल जेट्टी पूर्णतः फेल गेली त्यामुळे या जेट्टीचा जलवाहतुकीसाठी उपयोग झाला नाही.या सोबत जेट्टी येथील पार्कींग तयार झाल्यावर अनेक वर्ष टेंडर झालेच नाही.राजपुरी येथील टेंडर झाले तर ठेकेदारांनी 38 लाखाची थकबाकी शासनाकडे भरली नसल्याने 10 नोव्हेंबरापासून मेरीटाईम बोर्डाने पार्किंगला टाळे लावले. दिवाळी हंगामापासून पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात पार्किंग बंद असल्याने पर्यटकांच्या गाड्या समुद्रावर वाळू लावाव्या लागत आहे. समुद्राच्या भरतीच्या वेळी पार्किंग जागा नसल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. पार्किंगचे पैसे भरून गाडीची सुरक्षा नसल्याने जेटीवरील पार्किंग लवकर सुरु करावी अशी मागणी पर्यटक करत आहेत

राजपुरी जेटीवरील कार्यालय व पार्किंगचा ठेका मुंबईतील व्यावसायिकाने 5 वषार्र्पूर्वी 17 लाख वार्षिक किंमतीला घेतला .परंतु राजपुरी येथील रहिवासी व बेरोजगार युवक वर्गाचे पार्किंगचे काम बंद झाल्याने त्यांच्यात वाद होऊ लागले म्हणून ठेकेदारांनी पार्किंग राजपुरी येथील युवकांना भाड्याने दिले. ठेक्यापेक्षा जास्त रक्कम युवकांकडून घेऊनदेखील शासनाला भरले नसल्याने ठेकेदाराचे 38 लाख शासनाला देणे बाकी राहिले.त्यामुळे मेरीटाईम बोर्डाने पार्कींग बंद करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती अधिकारी सुधीर देवरे यांनी दिली.

मुलभूत सुविधांचा अभाव
मेरीटाईम बोर्डाने बांधलेल्या राजपुरी जेट्टीवर कायम स्वरूपी पाणी नसल्याने स्वच्छतागृह अस्वच्छ असतात.ठेकेदारांलाही बाहेरून पाणी विकत आणून स्वच्छता करायची तर परवडत नाही.जेट्टीचे बांधकाम चुकीचे असल्याने भरतीला समुद्राचे पाणीला करंट असल्याने जेट्टीवर बोटी लावणे कठीण जाते.त्यामुळे बोटवाल्याने तयार केलेल्या तात्पुरत्या जेट्टीवर प्रवाशाना जीव मुठीत घेऊन चढावे लागते. तिकीट खिडकी बाहेर असल्याने पर्यटकांना कडक उन्हात रांगेत उभे राहून तिकटी काढावे लागते .हीच रंग पुन्हा जंजिरा किल्लता देखील लावावी लागते ह्यामुळे पर्यटक नाराज आहेत

मेरीटाईम बोर्डाने जेट्टी बांधल्यापासून स्थानिक ग्रामपंचायत ,व प्रशासन कडे कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची मागणी केली आहे. परंतु 5 वर्ष झाली अजूनही ते मिळाले नाही. ठेकेदाराला ठेका दिल्यानंतर जेट्टी वरील स्वच्छता,पर्यटकांच्या सुविधा ठेकेदाराने करायची आहे .परंतु ठेकेदार ते करत नसल्याच्या पर्यटकांच्या तक्रारी आल्या आहेत .ठेकेदारांनी शासनाचे 38 लाख देणे बाकी असल्याने त्याचा ठेका रद्द करून जेट्टीवरील पार्कींग तात्पुरते बंद केले आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांना कळवण्यात आले असून लवकरात लवकर नवीन टेंडर निघेल व पार्कींग सुरु होईल.

सुधीर देवरे, मेरीटाईम बोर्ड अधिकारी

Exit mobile version