। मुंबई । दिलीप जाधव ।
राज्यसभेच्या 6 जागांसाठी झालेल्या मतदानात एकमेकांची मते बाद करण्याच्या खेळीमुळे संध्याकाळी उशिरापर्यत मतमोजणी सुरु होऊ शकली नव्हती. भारतीय जनता पक्षाने हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे नेला असल्याने या निवडणुकीच्या निकालाबाबत अनिश्चितता निमार्ण झाली होती.
काँग्रेसच्या आ. यशोमती ठाकूर, शिवसेना आ. सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रसचे आ. आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप भाजपा नेते पराग अळवणी आणि आशिष शेलार यांनी केला. संबंधित आमदारांनी राज्यसभा निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांची मतं अवैध ठरवावी, अशी मागणी भाजपा नेते पराग अळवणी यांनी निवडणूक अधिकार्यांकडे केली. तर भाजपाचे जेष्ट आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदान करताना चंद्रशेखर बावनकुळे यांना मतपत्रिका दाखवली असा लेखी आरोप कोंग्रेसचे आमदार अमर राजुरकर यांनी केला. या दोघांच्या परस्परविरोधी आरोपांमुळे निवडणूक निर्णय अधिकार्यांचा निर्णय येईपर्यन्त मत मोजणी मुळातच उशिरा सुरु झाली. पण विधानभवनातील निवडणूक अधिकार्यांनी हे आरोप फेटाळल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्याविरुध्द अपील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे प्रकरण दिल्लीत उपस्थित करण्यात आले. यापूर्वी गुजरातेत अहमद पटेल यांच्या राज्यसभेच्या वेळी झालेल्या प्रकाराचा या तक्रारपत्रात हवाला देण्यात आला असल्याचे कळते.
भाजपचे पुण्यातील कसबा पेठ मतदार संघातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना आज रुग्णवाहिकेने विधानभवन परिसरात मतदानासाठी आणण्यात आले तर राष्ट्रवादी चे पिंपरी -चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेने विधानभवनात आणण्यात आले होते. राष्ट्रवादी कोंग्रेसचे ईडी च्या अटकेत असलेले मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता यावे म्हणून काल सेशन कोर्टात धाव घेतली होती मात्र त्यांची मागणी कोर्टाने फेटाळली, त्वरित आज उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली मात्र उच्च न्यायालयाने हि त्यांना मतदान करण्याची मागणी फेटाळली त्यामुळे राष्ट्रवादी कोंग्रेस ची 2 मते कमी झाली. त्यामुळे उमेदवारांचा 42 चा कोटा 41 वर आला. त्यातच भाजपचे अनिल बोंडे यांनी पुडी सोडली की कोंग्रेस आणि राष्ट्रवादी कोंग्रेस ने आपल्या उमेदवारांना 44 चा कोटा दिला. त्यामुळे शिवसेनेच्या गोटा त काही वेळे साठी खळबळ उडाली मात्र महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकी नंतर ही अफवा भाजपने पसरवली असल्याचे नेत्यांना समजले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वता पूर्ण मतदान होई पर्यन्त विधान भवनात तळ ठोकून होते.
महाविकास आघाडीकडे एम आय एम ,बहुजन विकास आघाडी, शेकापक्ष आणि अपक्ष आमदा रांची संख्या जवळपास 169 च्या घरात असल्या मुळे त्यांनी महाविकास आघाडी च्या चार हि उमेदवारांना 43 चा कोटा दिला. त्यामुळे सहजच भाजप चे धाबे दणाणले, कारण भाजप कडे स्वताची मते 106 अधिक 5 अपक्ष आणि जनसुराज्य पार्टी चा 1 आमदार रवि राणा 1 असे एकूण 113 च्या वर जात नव्हती, त्यांच्या 3 उमेदवारांसाठी 41 कोट्या नुसार 123 मते आवश्यक होती. पण त्याची शक्यता धुसर झाली होती.