अध्यक्षपदी राकेश खराडे यांची निवड

| रसायनी | प्रतिनिधी |

रसायनी येथील पत्रकार राकेश खराडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकार समूहात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी राकेश खराडे यांनी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष ही पदे यशस्वीपणे भूषविली असून, संघटनात्मक कार्यात सक्रिय योगदान देत त्यांनी पुढील वाटचाल केली आहे. कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर तसेच मुंबई या जिल्ह्यांचे मुख्य प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी व राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी प्रदान केले आहे.

Exit mobile version