विद्यालयाकडून सैनिकांसाठी राख्या

| चिपळूण | प्रतिनिधी |

शिरगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरगाव विद्यालयात बनवलेल्या राख्या सैनिकांसाठी पाठवण्यात आल्या. नैसर्गिक धाग्यांचा वापर करून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सीमेवरील जवानांसाठी राख्या तयार करून त्यांचे प्रदर्शन भरवले. त्या राख्या पोस्टाद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी एक राखी जवानांसाठी या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राखी प्रदर्शन उपक्रमासाठी स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शालेय कमिटी सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version