| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन येथे रविवार, दि. 10 सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भव्य रॅली काढण्यात आली होती. त्यामध्ये बाईकस्वार व तालुक्यातील, शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर रॅली श्रीवर्धन एस्.टी.स्थानकापासून निघून छ.शिवाजी महाराज चौक,बाजार पेठ,प्रभु आळी,नारायण पाखाडी या मार्गाने श्री सोमजाई मंदिराच्या पटांगणात आली.
ठाकरे गटाचे द.रायगड प्रमुख अनिल नवगणे,रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम,माजी आमदार तुकाराम सुर्वे,सुजित तांदळेकर, श्रीवर्धन तालुका प्रमुख अविनाश कोळंबेकर, शहर प्रमुख राजेश चव्हाण ,जुनेद दुस्ते व शेकडो शिवसैनिकांचा रॅलीमध्ये समावेश होता. श्री सोमजाई मंदिराच्या पटांगणात रॅलीला अनिल नवगणे,संजय कदम,सुजित तांदळेकर आदींनी संबोधित केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनिल नवगणे हे आपले उमेदवार असतील तर लोकसभेसाठी अनंत गीते हे उमेदवार असतील असे यावेळी बोलतांना संजय कदम यांनी सांगितले. तालुका प्रमुख अविनाश कोळंबेकर यांनी रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांचे तसेच दिलेल्या सहकार्याबद्दल शासकीय यंत्रणेला धन्यवाद दिल्यानंतर रॅलीची सांगता झाली. या रॅलीचे वेळी पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.