| पाली/गोमाशी | वार्ताहर |
किल्ले सुधागडच्या पायथ्याशी असलेल्या श्रीक्षेत्ररामवाडी-पाच्छापूरमधील रामवाडी ग्रामस्थ मंडळ व श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळ, रामवाडी या मंडळांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे 74वा श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. विद्यमान वर्ष मंडळाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्याचे प्रसिद्ध केलेल्या पत्रकारद्वारे जाहीर केले आहे. यावर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, पारंपरिक, कला आणि उपक्रमांचे आयोजन करण्याचा मंडळांचा मनोदय आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, रविवार, 30 मार्च ते 12 एप्रिल चैत्र पौर्णिमा हा पंधरावडा श्रीराम जन्मोत्सव म्हणून साजरा होणार आहे. सकाळी ध्वजारोहण, सायंकाळी श्रीराम विजय ग्रंथाचे वाचन, प्रतिदिवशी श्रीहरिपाठ तसेच रविवार 6एप्रिल रोजी अभ्यंगस्नान, सामुदायिक श्री रामनाम जप व सार्थ श्री रामरक्षा स्तोत्र वाचन, एकनाथमहाराज वाडीकर यांचे श्रीराम जन्मोसवाचे कीर्तन, पालखी सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुधागड तालुक्यातील सर्व विद्यमान सरपंच उपसरपंच यांच्यासह मावळ भूषण नंदकुमार सोनुजी वाळंज यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवर, विविध संस्थांचे व मंडळाचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ, छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट अर्थातच छावा या हिंदी चित्रपटाचे प्रक्षेपण तसेच शुक्रवार,11 एप्रिल रोजी श्रीसत्यनारायणाची महापूजा व शनिवार, 12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव असा भरगच्च कार्यक्रम असलेला पंधरवडा श्रीराम जन्मोत्सवाचे जन्मोत्सव म्हणून प्रतिवर्षीप्रमाणे साजरा होणार असून, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी सुधागड तालुका ठाणे, मुंबई, पुणे व इतर शहरवासियांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राजू सीताराम पातेरे यांनी मंडळाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
निवारा शेडचे लोकपर्पण
शनिवार 5 एप्रिल रोजी सुधागड तालुक्याचे आदर्श लोकनेते सुरेश खैरे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या व विद्यमान सरपंच उत्कर्षा रोशन बेलोसे यांच्या विशेष प्रयत्न व सौजन्याने सुशोभिकरण केलेल्या मंदिराशेजारील निवारा शेडचे लोकार्पण करण्यात येणार आहे.