अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शन
| अयोध्या | वृत्तसंस्था |
अयोध्येतील वातावरण राममय झालं आहे. मंदिराच्या गाभार्यात वेगळीच वलय जाणवली. राम मंदिर आमच्या अस्मितेचा विचार. राम मंदिर भारतवर्षासाठी अस्मिता. राम मंदिर हे स्वप्न बाळासाहेबांनी पहिल्यांदा पाहिलं होतं. हिंदुत्वाचं प्रतिक आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या कामाला वेग आला आहे. मंदिराच कामं इतक्या वेगानं होतयं ही आश्चर्याची गोष्ट आहे.असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी अयोध्या येथे काढले.
शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री,आमदार,पदाधिकारी यांच्यासमवेत अयोद्धेतील राम मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.यावेळी त्यांच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले.यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस,ठाकरे गटावर हल्लाबोल केला. राममंदिर राजकारणाचा विषय अजिबात नाही. माझ्या दौर्याचा काही लोकांना त्रास होत आहे. ते जाणून बुजून टीका करतायत. काही लोकांना हिंदूत्वाची अॅलर्जी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हिंदूत्व आहे. हिंदू धर्म सर्व धर्माचा आदर शिकवतो. मोदींमुळे देशात हिंदुत्वाचा जागर मांडला गेला. काही अल्पसंतुष्ट लोक गैरसमज पसरवत आहेत.असेही ते म्हणाले.
अवकाळी पावासामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामं करण्याचे आदेश दिले आहेत. मी ऑफिस किंवा घरात बसून काम आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. जमिनीशी नाता असणारा मुख्यमंत्री आहे. प्रभु रामाच्या आशीर्वादाने आम्हाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळालं.असे ते म्हणाले.
काँग्रेसवर टीका
देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही आहेत. नाव नं घेता राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंनी टीका केली. आपलं सरकार नसतं तर साधूंच्या जीवाला धोका असता. अयोध्या दौर्याला नावं ठेवू नका. नाही तर प्रभु श्रीरम धडा शिकवतली. असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांना दिला.
आज भाजप शिवसेना पुन्हा सत्तेत आलं आहे. त्याचा जनतेला आनंद आहे. महाराष्ट्रात जनतेनं भाजप शिवसेनेला मतं दिली. मात्र, काही लोकांनी स्वार्थापोटी कौल नाकारला. सत्तेसाठी काही लोकांनी बाळासाहेबांच्या स्वप्नाला तिलांजली दिली. बाळासाहेबांच स्वप्न नरेंद्र मोदींनी पूणर्र् केले.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री