रायडात रमजान ईद उत्साहात साजरी

| रायडात | प्रतिनिधी |

मुस्लिम धर्मियांचा रमजान महिन्यातील पवित्र समजला जाणारा महिना संपला आहे. त्यानिमित्ताने गुरूवारी (दि.11) रमजान ईद साजरी करण्यात आली. या निमित्त रायगडात ठिक-ठिकाणी सकाळपासूनच मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करण्यासाठी गर्दी केली होती. तसेच, सर्व मुस्लिम बांधव मशिदीबाहेर आल्यानंतर त्यांचे स्वागत पोलिसांनी गुलाब पुष्प देवून करण्यात आले.

म्हसळ्यात रमजान ईद उत्साहात

मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिन्याचे उपवास बुधवारी समाप्त झाले आणि गुरूवारी अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात ईदचा सण साजरा करण्यात आला. यावेळी म्हसळ्यातील मुस्लिम समाजातील हजारो लहानांपासून थोरांपर्यंत बंधू भगिनींनी ईदगाह येथे एकत्रित जमून ईदची नमाज अदा केली.
या प्रसंगी मुस्लिम समाज अध्यक्ष नाझिम चोगले, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विवेक बुगरीकर, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, जिल्हा वाहतूक नियंत्रक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे, पोलीस निरीक्षक पवन चौधरी, नगराध्यक्ष संजय कर्णिक, नाजीम हसवारे, समीर बनकर,धर्मराज पाटील, गणेश तेलंगे, फझल हलडे, शाहिद उकये, सईद अहमद कादिरी, शहानवाज उकये आदि मान्यवर, मुस्लिम बांधव उपस्थित होते.


ईद निमित्त अलिबाग मधील जामा मशीदीत नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवानी एकमेकांना अलींगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने देखील मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

पनवेलच्या मुस्लिम नाक्यावर रमज़ान ईद निमित्त मुस्लिम बांधव नमाज अदा केल्यावर पोलिस अधिकार्‍यांकडून तसेच पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्याकडून मुस्लिम बांधवाना गुलाब पुष्प देवून ईदच्या शुभेच्या दिल्या.

अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना पोयनाड पोलीस स्टेशन तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. रमजान ईद निमित्त पनवेलच्या मुस्लिम बांधवांनी पनवेलच्या ईदगाह येथे नमाज अदा केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.

Exit mobile version