| माणगाव | प्रतिनिधी |
ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद रविवारी (दि.10 जुलै) सर्वत्र साजरी केली जाणार आहे. या ईदची जोरदार तयारी मुस्लिम बांधवांकडून करण्यात आली आहे. रमजान ईदच्या नंतर दोन महिन्यांनी बकरी ईद येते. यावर्षी रमजान ईदसारखीच बकरी ईद अत्यंत उत्साहात मुस्लिम बांधव साजरी करणार आहेत. माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला येथील जामा मशिदीत बकरी ईदची नमाज सकाळी 8 वाजता होणार असल्याचे या मोहल्ल्याचे अध्यक्ष सरफराज अफ़वारे यांनी सांगितले.