। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पाताळगंगा परिसरातील कराडे बुद्रुक जांभिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामचंद्र भाऊ पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 68 वर्षांचे होते.ते सामजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगी, जावई, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.