रमीझ राजाची पाक संघावर टिका

। लाहोर । वृत्तसंस्था ।

पाकिस्तानी संघ विश्‍वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळत असताना त्यांना माजी खेळाडूंच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. टी-20 विश्‍वचषकाच्या तोंडावर शेजार्‍यांना इंग्लंडकडून टी-20 मालिकेत 0-2 असा दारूण पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष रमीझ राजाने बाबर आझमच्या संघावर सडकून टीका केली होती. अशातच आता संघाचा माजी खेळाडू अहमद शहजादने बाबरला खुले आव्हान दिले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अहमद शहजादने म्हटले की, लोकांनी खूप संयम बाळगला आहे. पण आम्ही क्रिकेटशिवाय कोणत्याच मुद्द्यावर भाष्य केले नाही. तो (बाबर आझम) स्वत:ला मोठा खेळाडू समजतो. असे असेल तर त्याने पाकिस्तानला विश्‍वचषक जिंकून द्यायला हवा. त्याला पाच मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. संघात ज्या प्रकारे दलालांच्या माध्यमातून खेळाडूंना संधी मिळत आहे हे लवकरच आम्ही उघड करू.

Exit mobile version