रामराज गावाचा संपर्क तुटणार; पुराच्या पाण्याचा गावाला वेढा

वाहतूक बंद , बाजारपेठेत शिरणार पाणी

|रायगड । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील रामराज गावाला पुराचा वेढा बसला आहे. सांबरकुंड खोरे, बोरघर खोऱ्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने डोंगरातील नद्या आणि ओढ्यांना आलेल्या पाण्याने महापुराची परिस्थिती रामराज परिसरात तयार झाली आहे. प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे.

रामराज परिसरात असणाऱ्या 52 गावांसाठी असणारी एकमेव बाजारपेठचा संपर्क तुटला आहे. रामराज गावात जाण्यासाठी असणाऱ्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. रामराज गावातील बाजारपेठ आणि पाड्यांमधून पुराचे पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा वेग पाहता रामराज परिसरातील भिलजी, बोरघर, या गावांना देखील पुरचा वेढा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Exit mobile version