रमजान उर्फ भाईजान खोजा काळाच्या पडद्याआड

। पेण । वार्ताहर ।
पेण नगरीचे माजी नगरसेवक तथा एक उद्योजक रमजान उर्फ भाईजान खोजा यांचे अल्पशा आजाराने नुकतेच राहत्या घरी निधन झाले. नगरसेवकाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी पेणमधील रस्ते चकाचक करण्याचा संकल्प केला आणि तो त्यांनी सिद्दीशी नेला. गरीब गरजूंच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून नगरपालिकांच्या शाळांमध्ये अनेक बदल करून अनेक सुविधा देखील त्यांच्या काळात झाल्या.
माजी नगराध्यक्ष संतोष श्रृगांरपुरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की माझे एक चांगले जवळचे सहकारी गेले. तसेच एक अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्व ज्यांना प्रशासनाचा गाडा अभ्यास असणार्‍या व्यक्तिमत्व हरवला आहे. ही न भरून निघणरी पोकळी आहे. भाईजान हे एका समाजापुरते मर्यादित नव्हते तर बहु समाजात त्यांनी काम केलेले आहे. आणि सर्वाना मिळून मिसळून बरोबर घेउन जाणारे व्यक्तिमत्व आज त्यांच्या जाण्याने नक्कीच पेण शहराची मोठी हानी झाली आहे.
त्यांच्या अचानक जाण्याने एक दानशूर व्यक्तिमत्व हरवल्याची भावना पेणकर यांच्या मनात आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक उद्योजक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी हजर होत्या.

Exit mobile version