पनवेल येथे रानभाजी महोत्सव

। चिरनेर । वार्ताहर ।
तालुका कृषी अधिकारी पनवेल यांच्यामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत मुंबई गोवा हायवे कल्हे बस थांबा येथे आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

रानभाज्या विक्री करणार्‍या महिलां बचतगटासाठी तालुका कृषी अधिकारी पनवेल यांच्याकडून आत्मा अंतर्गत विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत छत्रीचे व टोपल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर घरत, पं.स. सदस्या मनीषा मोरे, आपटा ग्रा.सदस्य सौ.मनीषा वाघे, सामाजिक कार्यकर्ते अंजू पवार सावंत उपस्थित होते.

Exit mobile version