सुधागड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरोपिलस 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
। सुधागड । प्रतिनिधी।
तालुक्यातील गोकुळवाडा येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत अटक आरोपिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पिडीता माथेरान येथील रहिवासी असून, सुधागड तालुक्यातील गोकूळवाड येथे आपल्या नातेवाईकांकडे राहायला आली होती. तर आरोपी(19) हा नेरळ येथील रहिवासी असून, तो गोकुळवाडा येथे गेला. पिडीतेला भेटून तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली.
तसे न करण्याकरिता त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरूद्ध पाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोमवारी (ता.13) सायंकाळी 4:11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आला.
तर आरोपिस शुक्रवार (ता.17) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे

Exit mobile version