नराधम दिराचा वहिनीवर बलात्कार

दिराला अटक; खोपोली पोलीस ठाणे हद्दीत ढेकू गावातील घटना

खोपोली | प्रतिनिधी |

नात्याला काळिमा फासणारे कृत्य वासनेने वखवखलेल्या दिराकडून ढेकू गावात घडले असून त्या नराधम दिराने वाहिनीवर दोनदा बलात्कार केला होता.तिच्या पतीने व तिने खोपोली पोलिसात तक्रार करताच नराधम दिराला ( चौरसीय ) खोपोली पोलिसांनी अटक केली आहे . त्याला न्यायालया समोर हजर केले असता 17 ऑगस्ट पर्यंत त्यास पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

पीडित महिला ही पती, मुलं आणि दिरासह शंकर मंदिर समोर ढेकु खालापूर येथे राहते. घरामध्ये पती व मुलासह झोपली असताना दिर चौरासिया ह्याने तिच्या झोपेचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला याने.पीडीतेला वाटले की तीचा पतीच आहे परंतु जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने पाहिले की तो आपला पती नसून दीर आहे, अश्या अवस्थेत  दीराला पाहुन ती मोठयाने ओरडली असता त्याने पुन्हा तिचेवर जबरी अतिप्रसंग केला.

भेदरलेल्या त्या पीडितेने दिराने केलेले दुष्कृत्य पतीला सांगितल्यानंतर पतीला धक्का बसला.त्याने पत्नीला घेऊन थेट खोपोली पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.तात्काळ खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी सदर गुन्हा सहा.पोलीस निरीक्षक सौ. कल्याणी पडोळे याचे कडे तापासास दिला असता त्यांनी कारवाई करीत त्या नराधमास अटक केली.

सदर गुह्यातील आरोपी दिरास अटक करून त्याचे विरोधात भा.द.वि कलम 376(2)(एन),506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्यास न्यायालया समोर हजर केले असता त्यास 17 तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास स.पो.नि कल्याणी पडोळे ह्या करीत आहेत.

Exit mobile version