पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

| मुंबई | वृत्तसंस्था |

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना सरकारने क्लीनचीट दिली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांची पोलिसांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याने चर्चा सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर राज्य गुप्तचर विभाग प्रमुख रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला होता. शुक्ला यांच्यावर दोन गुन्हे नोंदवण्यात आले होते. यांपैकी एक एफआयआर पुण्यात तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. दोन्ही गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोंदवण्यात आले होते. पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड करण्यात आले होते.

Exit mobile version