रत्नाकर कनोजे सेवानिवृत्त

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील पुगांव केंद्राचे केंद्रप्रमुख रत्नाकर कनोजे केंद्रप्रमुख या पदावरुन सेवानिवृत्त झाले. 1985 साली शिक्षकी सेवेत रूजू झालेले रत्नाकर कनोजे यांनी आपल्या सेवाकार्याला पोलादपूर येथून प्रारंभ केला. त्यानंतर रोहा तालुक्यातील धामणसई शाळेत पदोन्नती मुख्याध्यापक व माणगाव तालुक्यातील चन्नाट येथे सेवाकार्य करून पुन्हा रोहा तालुक्यात हजर झाले. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रात व संघटनात्मक क्षेत्रात विविध जबाबदार्‍या पार पाडून विविध पदभार स्वीकारून आपले मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध सामाजिक संस्था व व्यक्ती यांच्याकडून विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मित्रपरिवारांनी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version