वक्तृत्व स्पर्धेत रातवड विद्यायलचे यश

| माणगाव | वार्ताहर |

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेची वक्तृत्व स्पर्धा शनिवार दि. 6 जानेवारी रोजी अभिनव विद्यामंदिर पारनाका, कल्याण येथे पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे उपाध्यक्ष प्रा. ना. के. फडके, डॉ. निलेश रेवगडे, मिनाक्षी गागरे, विश्वास सोनवणे, ऋषिकेश केळकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत रातवड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तीनही गटात प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले.

सदर स्पर्धेत आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयातील इयत्ता आठवीतून संस्कृती ऐत प्रथम, इयत्ता नववीतून श्रेया मरवडे प्रथम क्रमांक, इयत्ता दहावीतून कस्तुरी देवकर प्रथम क्रमांक यांनी यश संपादन केले. या स्पर्धेत रातवड विद्यालयाने यश संपादन केल्याबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी, शालेय समिती अध्यक्ष संजय पालकर, मुख्याध्यापक महादेव जाधव व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version