| पेण | प्रतिनिधी |
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत रावे जिल्हा परिषद मतदार संघात शेकापने दणदणीत विजय संपादित केला होता. आगामी निवडणुकीतही शेकापचा लालबावटाच दिमाखात फडकला जाईल, असा निर्धार माजी आम.धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापने पेण तालुक्यात जोरदार मोर्चेबांधमी सुरु केलेली आहे. त्यानुसार रावे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत धैर्यशील पाटील यांच्यासह या बैठकीसाठी अर्थ व बांधकाम सभापती अॅड.निलीमा पाटील, कृऊबा सभापती सुरेश पाटील, लाल ब्रिगेडचे अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, प्रफुल्ल म्हात्रे, संदेश ठाकूर, महेश ठाकूर, नगरसेवक संतोष पाटील, आदिंसह रावे-हमरापूर विभागातील कार्यकर्ते हजर होते. गत निवडणुकीत या मतदार संघातून पिंट्याशेट पाटील हे दणदणीत मतांनी विजयी झालेले होते.दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यामुळे आगामी निवडणुकीतही जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन अशा तिनही जागा निवडून आणून स्व.पिंटया पाटील व स्व.दिनेश पाटील यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला. पिंटया पाटील यांच्या अकाली निधनाने द्विधा मनस्थितीत असलेल्या कार्यकर्त्यांसी संवाद साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्ये भावनिक न होता आपली मते मांडली. यामध्ये जे साम-दाम-दंड-भेद या बाबींचा वापर करुन आणि रावे जिल्हा परिषद मतदार संघ पुन्हा शेकापकडेच अबाधित ठेवण्याचा मनोदयही व्यक्त करण्यात आला. बैठकीत आर.के.सर, दिलीप पाटील, प्रविण पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक पाटील, अंतोरे सरपंच अमित पाटील, कळवा सरपंच कमलाकर मोकल, व ज्येष्ठ नेते राजा पाटील यांनी मते मांडली. यामध्ये भविष्यातली उमेदवारी पिंट्या पाटील यांच्या घरातच दयावी अशीही मागणी झाली. यावर आ.धैर्यशिल पाटील यांनी सांगितले की, सर्व बाबींचा योग्य अभ्यास करून हा निर्णय घेऊ आणि उमेदवारी कोणाला दयायची हे निश्चित करू. कित्येक महिन्याने झालेल्या बैठकीत धैर्यशील पाटलांच्या मार्गदर्शनामुळे एक नवे चैतन्य निर्माण झाले.
- रावे जिल्हा परिषद मतदार संघातून तिन्ही जागा निवडून पिंटयाशेट पाटील व दिनेशशेट पाटील यांना शेकापचा विजय समर्पित करणार. – धैर्यशील पाटील,माजी आमदार