| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आरसीएफ प्रायमरी स्कूलच्या वतीने शुक्रवार, दि. 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर.सी.एफ. सेकंडरी स्कूलचे शिक्षक अजिंक्य शिंत्रे लाभले होते. शिक्षिका बलबीर यांनी जिजाऊंची, तर प्राची पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांची माहिती सांगितली. शिंत्रे यांनी मुलांना स्वामी विवेकानंदांच्या बोधात्मक कथा सांगून मंत्रमुग्ध केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रायमरीच्या मुख्याध्यापिका प्राची बांदिवडेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत जास्वंदीचे रोपटे देऊन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, फलकलेखन आणि आभार शिक्षिका लीना यांनी केले.